गोपाल दालमील परिसरात तरूणाचा मृतदेह आढळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी परिसरातील गोपाल दालमील परिसरात एका तरूणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना रविवारी ४ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चंद्रशेखर रमेश सपकाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत झालेल्‍या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील चंद्रशेख सपकाळे हा पत्नी, आई व मुलासह वास्तव्याला होता. एमआयडीसी परिसरातील जलराम चटाई कंपनीत काला होता. त्याचे दोन भाऊ हे मिरचीचा व्यवसाय करतात. म्हणून शुक्रवारी आणि शनिवारी ३ जुन रोजी त्यांच्या व्यावसायात मदत करण्यासाठी गेला. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेनंतर कामाच्या निमित्ताने एमआयडीसीतील त्याच्या कंपनीत गेला होता. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत चंद्रशेखर हा घरी आला नाही. दरम्यान, रविवारी ४ जून रोजी सकाळी ७ वाजता जलाराम चटाई कंपनीजवळील गोपाल दालमील कंपनीजवळ त्यांचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. चंद्रशेखर याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सकाळी १० वाजता शविविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मयताच्या पश्चात आई सुशिलाबाई, पत्नी छाया, मुलगा जयेश (वय-७), मनोज व शशिकांत हे दोन भाऊ असा परिवार आहे.

Protected Content