गोंडगाव प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा करा; मराठा महासंघाचे निवेदन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोंडगाव येथील बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा करा या मागणीसाठी जामनेरात मराठा महासंघ व कन्या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेखी निवेदन नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांना दिले आहे.

 

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका गरीब कुटुंबातील लहान बालिकेवर त्याच गावातील सोन्या उर्फ स्वप्निल विनोद पाटील (वय – 19) या नराधमाने अत्यंत क्रूरपणे अत्याचार करुन निर्दयीपणे डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे पोलीस तपासात कबूल केले असून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मराठा महासंघ तर्फे करण्यात आली आहे त्याबाबत लेखी निवेदन देऊन सदर आरोपीस कठोरातील कठोर शासन व्हावे. यात संशयिताच्या कुटुंबाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर शिक्षा करावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा, खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणीचे निवेदन दिले आहे.

 

याप्रसंगी मराठा महासंघाचे राहुल चव्हाण, अशोक पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ.नंदलाल पाटील, माधव चव्हाण,

अतुल सोनवणे, विश्वजित पाटील, नरेंद्र धुमाळ, सुनील कानडे, दशरथ पाटील, उमेश पाटील, नवल पाटील, सागर पाटील, शांताराम माळी, अशोक पवार, अजय मराठे, संदीप मराठे, भरत पवार, संदीप पाटील, प्रवीण गावंडे, संदीप मराठे यांच्यासह शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content