Home Agri Trends ‘थेंब अमृताच्या’ मोहिमेला सर्वतोपरी मदत- ना. महाजन

‘थेंब अमृताच्या’ मोहिमेला सर्वतोपरी मदत- ना. महाजन

0
38

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । सातपुड्यात पायथ्याशी सुरू असलेल्या ‘थेंब अमृताच्या’ या मोहिमेला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिली. ते सावदा येथील एका छोटेखानी कार्यक्रमात बोलत होते.

रावेर-यावल तालुक्यात संतमहंतांच्या प्रेरणेतून थेंब अमृताचा ही मोहीम सुरू करण्यात आली असून यात लक्षणीय पध्दतीत लोकसहभाग दिसून येत आहे. दरम्यान, सावदा येथील स्वामीनारायण गुरूकुलमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ना. गिरीश महाजन यांनी या मोहिमेची प्रगती जाणून घेतली. याप्रसंगी गुरुकुलचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रकाशदास, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, अनिल लढे, नीलेश राणे, हर्षल पाटील उपस्थित होते. याप्रसंगी ना. महाजन यांनी या मोहिमेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून यासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound