विद्यापीठात परिसर मुलाखतीत सात विद्यार्थ्यांची अंतिम फेरीत निवड

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात युपीएल लि या कंपनीतर्फे झालेल्या परिसर मुलाखतीमध्ये स्कूल ऑफ केमिकल सायन्सच्या सात विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड केली.

विद्यापीठाच्या स्कूल ऑफ केमिकल सायन्सच्या एम.एस्सीच्या (पेस्टीसाईड अ‍ॅण्ड अग्रोकेमिकल) विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी कंपनीचे सिनियर जनरल मॅनेजर सतीश भोगे, डेप्युटी जनरल मॅनेजर विकास ओलतीकर आणि एचआर मॅनेजर गौरव वाघ हे उपस्थित होते. यात स्कूल ऑफ केमिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा व समूह चर्चा घेऊन मुंबई येथे शेवटच्या फेरीसाठी सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील, प्र-कुलगुरु प्रा. पी. पी. माहुलीकर, कुलसचिव भ. भा. पाटील व रसायनशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. धनंजय मोरे यांनी स्वागत केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे. केंद्रीय प्रशिक्षण आणि नियुक्ती कक्षाचे समन्वयक डॉ. भूषण चौधरी यांच्यासह प्रा. रत्नमाला बेंद्रे व प्रा.विकास गिते हे याप्रसंगी उपस्थिती होते.

Add Comment

Protected Content