Home Cities जामनेर आ. गिरीश महाजन व अमित शाह यांच्यात गुफ्तगू !

आ. गिरीश महाजन व अमित शाह यांच्यात गुफ्तगू !

0
31

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील गतीमान राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमिवर माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांनी दिल्लीत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

एकीकडे राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार खोळंबला आहे. तर दुसरीकडे राज्यात शिवसेना प्रखरपणे सत्ताधार्‍यांवर टीकास्त्र सोडत आहे. या पार्श्‍वभूमिवर माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांनी गुरूवारी सायंकाळी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. स्वत: आमदार महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध प्रकल्पांबाबत आपण चर्चा केल्याचे म्हटले आहे. तथापि, जिल्हा विकासाचे बहुतांश विषय हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असतांना ते शाह यांच्या सोबत वेगळ्याच विषयावर बोलले असतील हे उघड आहे.

आमदार गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराच्या संदर्भात त्यांनी अमित शाह यांच्या सोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थात, यातून मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound