जळगाव प्रतिनिधी । भाजप कोअर समितीच्या बैठकीनंतर एकाने माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या कारवर दगडफेक करून यांना शिवीगाळ करण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तर याबाबत मात्र अद्यापही पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही. याबाबत वृत्त असे की, शुक्रवारी रात्री भारतीय जनता पक्षाच्या कोअर समितीची बैठक संघटन मंत्री विजय पुराणिक आणि माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर आ. महाजन हे प्रसारमाध्यमांशी बोलून आपल्या कारमधून निघाले असतांना एका व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने एक दगड भिरकावला. पदाधिकार्यांनी धाव घेत त्याला अटक केल्यानंतर गिरीश महाजन हे तेथून निघून गेले. दरम्यान, संबंधीत व्यक्ती हा मनोरूग्ण असून तो पक्षाचा पदाधिकारी वा कार्यकर्ता नसल्याची सफाई भाजपतर्फे देण्यात आलेली आहे. तथापि, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गिरीश महाजन यांना जळगावात शिवीगाळ
4 years ago
No Comments