जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी आज ना. गिरीश महाजन आणि सुरेशदादा जैन आज स्वत: मैदानात उतरल्यामुळे येथील लढतीत खर्या अर्थाने रंग भरणार आहे.
आमदार उन्मेष पाटील यांनी आज जळगावातून आपल्या प्रचारास प्रारंभ केला. जुने जळगावातील श्रीराम मंदिरात नारळ अर्पण करून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर शहराच्या विविध भागांमधून त्यांच्या प्रचाराची फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रचार फेरीत आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे, जि.प. अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील यांच्यासह मान्यवर आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. ठिकठिकाणी या प्रचार फेरीचे स्वागत करण्यात आले.
मात्र यात खरी रंगत चढली ती जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या सहभागानंतरच ! या दोन्ही मान्यवरांनी आज शहरातील नागरिकांना आमदार उन्मेषदादा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यामुळे आता आमदार उन्मेष पाटील यांच्यासाठी भाऊ व दादांची जोडी उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून यामुळे साहजीकच जळगाव मतदारसंघातील लढाई रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Only bjp