आचारसंहितेपूर्वीच भागपूर योजनेचे भुमीपुजन-ना. महाजन

पहूर ता जामनेर प्रतिनिधी । आचारसंहिता लागण्यापूर्वीच भागपूर योजनेचे भूमिपुजन करण्यात येणार असल्याची माहिती आज ना. गिरीश महाजन यांनी दिली.

जामनेर रोडवरील जिनिंग मध्ये आयोजित भाजपच्या वतीने मोटारसायकल विजयी संकल्प रँली च्या समारोप प्रसंगी ना.गिरीश महाजन बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जे.के.चव्हाण, उपसभापती सुरेश बोरसे, कृउबास सभापती संजय देशमुख, रामेश्‍वर पाटील,शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष दौलत घोलप, माजी सभापती बाबुराव घोंगडे,सलीम शेख गणी, ललीत लोढा, अमर पाटील, अतिष झाल्टे,कमलाकर पाटील, अरविंद देशमुख, शरद पांढरे, रवींद्र मोरे,वासुदेव घोंगडे डॉ. प्रशांत भोंडे, यांच्या सह विधान सभा क्षेत्रातील जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरंपच, उपसरपंच, व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी ना. गिरीश महाजन म्हणाले की, मोदी सरकारने शेतकरी हिताच्या योजना राबविल्या असून शेती मालाला दीड पट हमीभाव दिला आहे. हे काँग्रेस सरकारला करता आले नाही.अनेक नवीन योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला आहे. पाचोरा व जामनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी दिले जाईल. त्या द्रुष्टीने भागपूर योजनेचा शुभारंभ करून कामाला गती देण्यात येईल. असे सांगून मोंदीसारखे वादळ देशाला लाभल्याने देशाला दिशा मिळाली आहे. देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असून पुन्हा भाजपचेच सरकार बहुमताने येणार असल्याचा दावा त्यांनी केला. प्रास्ताविक चंद्रकांत बाविस्कर यांनी तर सुत्रसंचालन नवलसिंग पाटील यांनी केले.

Add Comment

Protected Content