जळगाव प्रतिनिधी| येथील तत्कालीन नगर पालिकेच्या राज्यभरात गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील शिक्षा झालेल्या आरोपींचा जामीन अर्ज मंजूर झाला आहे. त्यात प्रामुख्याने माजी मंत्री गुलाबराव देवकर,आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह नगरसेवकांचा समावेश आहे.
धुळे कोर्टाने आरोपींनी दंडाची रक्कम भरून वरच्या कोर्टात अपील करण्याचे व जामीन मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या आरोपींनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात त्यासाठी केलेल्या अर्जानुसार आज त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माजीमंत्री गुलाबराव देवकर तसेच आ.चंद्रकांत सोनवणे यांच्यासह शिक्षा झालेल्या सुमारे २७ जणांनी जामिनासाठी अर्ज केले होते. यातील दवाखान्यात दाखल असलेल्यांच्या जामीन अर्जावर तूर्त निर्णय देण्यात आलेला नाही. तसेच सुरेश जैन,राजेंद्र मयूर,जगन्नाथ वाणी,प्रदिप रायसोनी यांना मात्र जामीन मंजूर झालेला नाही. दरम्यान, यापूर्वी जामीन अर्जावर दोनवेळा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आज अखेर त्यावर निर्णय झाला असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.