राज्यात करोनाग्रस्तांची संख्या संख्या ४९ वर

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढतेय. आजच्या घडीला राज्यात करोनाग्रस्तांची संख्या संख्या ४९ वर पोहचली आहे. परंतू प्रशासन सर्व प्रकारची काळजी घेत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

राजेश टोपे यांनी सांगितले की, प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. ३१ तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. फेज २ मधून फेज ३ मध्ये जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, असही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर १२ तासात चार नवे रुग्ण आढळले आहेत. संसर्ग होण्याचे प्रमाण ५० मध्ये १० आहेत. मुंबई पुणे बससेवा बंद करण्यात आलेली नाही. मात्र लोकांनी कार्यालयात येणे टाळावे. ट्रेन बंद करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, लोकांनी मात्र ती वेळ शासनावर आणू नये, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

Protected Content