यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे गायरान गावात आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याने गावातील आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. आमचे ही ‘घर’ होण्यासाठी त्यांना थेट पंचायत समिती स्तरावर उपोषणाला सुरुवात केली असून आदिवासी समाजसेवक संजीव शिरसाठ, बिरम बारेला यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या उपोषणाला आ. लताताई सोनवणे यांच्या मध्यस्थीने गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती देण्यात आली.
याबाबत प्राप्त माहिती अशी, घरकुल मिळावे यासाठी गायरान येथिल आदिवासी बंधु भगिनीं बिराम बारेला संजीव शिरसाठ जिल्हा सरचिटणीस शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र शाखा जळगाव यांचे नेतृत्वाखाली १००/१५० महिला पुरुष हे घरकुल मिळावे, यासाठी ५ जुलै मंगळवार रोजी पंचायत समिती आवारात उपोषणाला बसले होते. आमदार लताताई सोनवणे यांनी गटविकास अधिकारी यावल यांना गायरान येथिल आदिवासी बांधवाचा घरकुल चा प्रश्न लवकरात लवकर मार्गि लावा, असे भ्रमणध्वनी द्वाराचर्चा झाली. त्यानंतर यावल पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड ( बोरसे )याचे दालनात आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ, बिराम बारेला यांनी सकारात्मक चर्चा केली.
यावेळी चिरमा बारेला, झिन्या बारेला, ललिता बारेला, गजऱ्या बारेला, शिल्या बारेला, गिना बारेला, नानबाई बारेला, चारली बारेला, भुरलीबाई बारेला, आमना बारेला, शामराव बारेला, चित्र्या बारेला, प्रेमसिंग बारेला, किशन बारेला, लखन बारेला, निरश्या बारेला, नकाराम बारेला, अर्जुन बारेला, सुनिल बारेला, नमसिंग बारेला यासह गायरांन येथिल सर्व आदिवासी बंधु भगिनीं उपोषणाला उपस्थित होते.
यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना लेखी निवेदन देण्यात आले. प्रा चंद्रकांत सोनवणे( माजी आमदार )व सौ लताताई सोनवणे आमदार चोपडा यांचे मध्यस्थीने आदीवासी बांधवांचे उपोषण तात्पुरते थांबविण्यात आले आहे.