जळगाव प्रतिनिधी । अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या भरधाव घंटागाडीने कारला जोरदार धडक दिल्याने कारचे नुकसान झाले असून दोन्ही वाहने शहर पोलीसात जप्त करण्यात आले आहे. याबाबत शहर पोलीसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद रामस्वरूप मणीयार रा. शिरसोली रोड, रमेशदादा यांच्या कंम्पाऊंड समोर यांच्या मालकीची कार क्रमांक (एमएच 19 एम 9087) वरील चालक वैभव रवी नन्नवरे (वय-32) रा. खोटे नगर हा सकाळी 11 वाजेच्या सुमारास नवीपेठेतील रेमन्ड शोरूम येथून नेहरूचौक कडून जात असतांना कारच्या पुढे जात असलेल्या पोलीसांच्या गाडीने अचानक ब्रेक लावल्याने कारनेही ब्रेक लावला. मात्र कारच्या मागे चालणाऱ्या महानगरपालिकेच्या घंटागाडीने ब्रेक न लावता पुढे थांबलेल्या कारला जोरदार धडक दिली. यात कारच्या मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. पोलीसांनी दोन्ही वाहने शहर पोलीसात जप्त केली असून घंटागाडीवरील चालकाच्या विरोधात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.