मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री, प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्र येत कामाला लागा असा सल्ला दिला.
बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक संदर्भात निर्णय दिला. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार, खासदार यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे घेण्यात आली. यावेळी ओबीसी आरक्षण मिळावे हि महाविकास आघाडीची भूमिका होती, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतीलच असे स्पष्ट करण्यात आले. राज्यात कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी गृहमंत्री प्रयत्न करत आहेत.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेवर सुनावणीनंतर आगामी दोन आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याचे निर्देश आहेत, त्यानुसार स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी निवडणुकासाठी एकत्र कसे येता येईल यावर चर्चा करण्यात येऊन कामाला लागा, असे निर्देश शरद पवार यांनी दिले आहेत, अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.