देव बहिरा नसल्याने त्याला लाऊडस्पीकरची गरज नाही – बाबा रामदेव

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । ध्वनी, वायू, वैचारिक आणि सांप्रदायिक प्रदूषण राज्य आणि राष्ट्रासाठी घातक असल्याचे म्हणत देव बहिरा नसल्याने त्याला लाऊडस्पीकरची लावायची गरज नाही असं म्हणत सर्वांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढावा  काढण्याचे आवाहन बाबा रामदेव यांनी केले आहे.

राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे खाली उतरवले नाहित तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करू अशी भूमिका घेतली या भूमिकेनंतर राज्यात त्याचे पडसाद उमटत असून अनेकजण यावर प्रतिक्रिया देत मत मांडत आहेत.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी 3 मे चा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर मुस्लिम संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता या वादात बाबा रामदेव यांनीही उडी घेतली असून देव बहिरा नाही, त्यामुळे त्याच्यासाठी लाऊडस्पीकर लावायची गरज नसून सर्वांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढावा, असे आवाहन बाबा रामदेव यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content