जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रुग्णालय म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील कोवीड वार्डमधील कंत्राटी कर्मचारी यांचे मागील पगार तात्काळ देण्यात यावे अशी मागणी जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे केली.
जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दूरध्वनीवरून आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी या विषयाबाबत चर्चा केली. यात त्यांनी कोविंड रुग्णालयातील थकीत देयके तात्काळ काढण्यात यावे जेणेकरून कोवीड युद्धांना त्यांचा हक्काचा पगार लवकरात लवकर मिळेल असे सांगितले. कोवीड रुग्णालयामधील कोवीड विभागामध्ये कार्यरत असलेले वॉर्डबॉय, सफाई कामगार अशा सर्व मैदानी कोविड योद्ध्यांचा विमा राज्यसरकारने काढावा जेणेकरून याकोवीड योद्ध्यांना राज्य सरकारच्या वतीने संरक्षण मिळेल व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळेल अशा प्रकारची मागणी आरोग्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली