मुंबई प्रतिनिधी । रिलायन्स जिओ फायबर वापरकर्त्यांसाठी यापुढे विनामूल्य ब्रॉडबँड सेवा मिळणार नाही. नवीन वापरकर्त्यांकडून कंपनीने ब्रॉडबँड सेवेसाठी शुल्क आकारण्यास सुरवात केली जात आहे. याव्यतिरिक्त, कंपनी जुन्या ग्राहकांना ब्रॉडबँड सेवेचे रिचार्ज किंवा पैसे देण्याच्या सूचना देखील पाठवित आहे. अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
जिओ फायबर बाजारात अधिकृतपणे लॉन्च होण्यापूर्वी ही सेवा सब्सक्राइब केलेल्या तब्बल पाच लाख जिओ फायबरच्या ट्रायल ग्राहकांना कंपनीकडून आता टॅरिफ प्लॅनवर शिफ्ट करण्यात येणार आहे. ही प्रकिया पुढच्या एक महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. ‘ फ्री ब्रॉडबॅंड सेवा लवकरच बंद होणार असून या सेवेचे लाभ घेण्यासाठी जिओ फायबरच्या प्लॅन्सला सब्सक्राइब करा’ अशी सुचना कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येत आहे.
जिओ फायबरची वैशिष्ट्ये?
सर्वात स्वस्त प्लॅन 699 रुपये प्रतिमहिना, तर सर्वात महागडा प्लॅन 8,499 रुपये प्रतिमहिना. या प्लॅन्समध्ये युजर्सना 100Mbps ते 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळतो. यामध्ये गेमिंग, होम नेटवर्क शेअरिंग, टीव्ही व्हिडिओ कॉलिंग आणि कॉन्फर्सिंगसह डिव्हाइस सिक्युरिटी आणि ओटीटी कंटेंट प्लॅटफॉर्म यांसारख्या सेवा वापरता येतात.