रिझव्‍‌र्ह बँकेची आजपासून पतधोरण निर्णयाची बैठक

rbi8 580x395

मुंबई वृत्तसंस्था । पतधोरण समितीच्या बैठकीतून व्याज दर बदलाबाबत निर्णय घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेची बैठक आज (दि.3) सुरू होत आहे. तीन दिवस सलग ही बैठक होणार असून व्याजदराबाबतचा बदल येत्या गुरुवारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर व व्याजदर निश्चितीसाठी नियुक्त पतधोरण समितीचे अध्यक्ष शक्तिकांत दास हे या बैठकीचे नेतृत्व करणार आहेत. याशिवाय समितीतील सदस्यांचाही बैठकीत समावेश आहे. यंदाच्या बैठकीत व्याजदर कपातीची अटकळ मानली जात आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचा प्रवास गेल्या सहा वर्षांच्या तळात पोहोचल्यानंतर ही व्याजदर कपात अपेक्षित मानली जात आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने यंदाही रेपो आदी प्रमुख दर कमी केल्यास यंदाची ती सलग सहावी कर्ज स्वस्ताई ठरेल.

Protected Content