जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २४ ते २६ मे, २०२४ रोजी जळगांव केंद्रावर सहकार विभागांतर्गत जी.डी.सी अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा शेठ. ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जळगांव जिल्हा पेठ, स्टेट बैंक ऑफ इंडिया मुख्य शाखेजवळ, जळगांव या केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी ज्या परिक्षार्थीनी सदर परिक्षेचे अर्ज केलेले आहेत.
अशा परिक्षार्थीनी आपले परीक्षा प्रवेशपत्र खात्याच्या संकेतस्थळावरुन (Website) आपण तयार केलेल्या लॉगईन आयडीवरून उपलब्ध करून घ्यावे. तसेच सदरबाबत परीक्षार्थीना काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, गौतम बलसाणे, सहकारी संस्था, जळगांव यांनी केले आहे.
सहकार विभागांतर्गत जी.डी.सी.ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा
11 months ago
No Comments