Home क्राईम गावठी पिस्तूलासह दोन जणांना अटक; पारोळा पोलीसांची कारवाई

गावठी पिस्तूलासह दोन जणांना अटक; पारोळा पोलीसांची कारवाई

0
82


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील धरणगाव बायपास रोडवर दुचाकीवरून बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्तून व जिवंत काडतूस घेवून जाणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात पारोळा पोलीसांना यश आहे आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतूस, दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकुण ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोघांवर पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा शहरातील धरणगाव बायपास जवळ २ जण दुचाकीवरून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पारोळा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी २२ जून रोजी रात्री ११ वाजता सापळा रचून दुचाकी आडविली. यावेळी संशयित आरोपी शामकांत एकनाथ पाटील आणि भिकन तुकाराम पाटील दोन्ही रा. पारोळा या दोघांची चौकशी केली असता त्यांच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आले. त्याची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. दरम्यान पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल दोन जिवंत काडतूस, दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर आर्म ॲक्ट नुसार पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.


Protected Content

Play sound