नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आगामी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (डीसी) संघाचा सहमालक होणार असल्याची शक्यता आहे. गंभीर जीएमआर ग्रुपशी सुमारे दोन महिन्यांपासून चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्सच्या भागीदारीसंदर्भात गौतम गंभीरची जीएमआर ग्रुपशी चर्चा सुरू आहे. यासंदर्भात ‘डील’ पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. आता केवळ आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची मंजुरी मिळायची आहे. गौतम गंभीर दिल्ली कॅपिटल्समध्ये १० टक्के भागीदारी घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे. जेएसडब्ल्यूने गेल्या वर्षी ५५० कोटी रुपये मोजून या संघाची ५० टक्के भागीदारी घेतली होती. त्यानंतर संघाचे दिल्ली डेअरडेव्हिल्स हे नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स असे ठेवले होते. मागील पर्वात हा संघ तिसऱ्या स्थानी होता.