मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हिंडेनबर्ग या रिसर्च फर्मने केलेल्या गौप्यस्फोटामुळे गौतम अदानी हे जगातील टॉप-१० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.
अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म हिंडेनबर्ग यांच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुरू असलेली प्रचंड घसरण थांबण्यास तयार नाही. याचमुळे ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या क्रमांकावरून अकराव्या क्रमांकावर आले आहेत. अदानींची मालमत्ता ८४.२१ अब्ज डॉलर्सवर आली आहे. यामुळे अदानी आता ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये अकराव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे अदानी यांच्या पाठोपाठ अंबानी मागे १२ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती डॉलर ८२.२ अब्ज आहे.