पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथील डॉ. वैष्णवी संदीप महाजन हिने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधुन गणितात वयाच्या २६ व्या वर्षी पी. एच. डी. प्रदान केली.
तालुक्यातील लोहटार येथील मुळ रहीवाशी ह. मु. पाचोरा जि. जळगाव येथील रहिवाशी स्वातंत्र्य सैनीक & पाचोरा न. पा. माजी ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर स्व. दामोदर लोटन महाजन यांची नात तर अ. भा. गुर्जर परिषदेचे राष्ट्रीय सचिव न्यु. दिल्ली , ध्येय करिअर अँकेडमी तथा ध्येय न्युज चॅनलचे संचालक संदीप दा. महाजन तथा पाचोरा श्री . गो. हायस्कुलच्या इंग्रजी विषयाच्या उप- शिक्षीका शितल सं. महाजन यांची मोठी कन्या कु. डॉ. वैष्णवी संदीप महाजन हिने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधुन गणितात (A+) पदवी तर एम. एस. सी. (A+) तसेच बी. एड. (A++) यश प्राप्त करून गणित विषयात तिने जे. जे. टी. यु. येथुन सर्टन इनव्हेस्टीगेशन आॅन एल्ग्रेब्रिक स्ट्रक्चर आॅफ गृप्स अॅण्ड रिंग्स या विषायात संशोधन करून पी. एच. डी. होण्याचा मान पटकावला.
दि. ६ मार्च रोजी जे. जे. टी. यु. येथे एंकर आणि राईटर हरीश भिमानी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. विनोद टिबडेवाल, आय. जी. सुरेंद्रकुमार गुप्ता, सी.आर. पी. एफ डी. आय. जी. नरेंद्रसिंह, खासदार नरेंद्र खिचड, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रदीप शर्मा, डॉ. मधु गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थीत कु. डॉ. वैष्णवी यांना पि. एच. डी. (मॅथ) विषयाची पदवी प्रदान करण्यात आली उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी वयात डॉक्टरेट होणारी पहीली विद्यार्थीनी ठरली आहे. कु. डॉ. वैष्णवी हल्ली पाचोरा येथील शेठ एम. एम. कॉलेज मध्ये सिनीअर कॉलेजला गेल्या तिन वर्षा पासुन मॅथ विभागाचे एच. डी. ओ. म्हणुन कार्यभार सांभाळत आहे.