कलासिद्धी फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कलासिद्धी फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यात महापौर जयश्री महाजन, डॉ.अनुराधा राऊत,गायत्री पाटील, डॉ. नेहा भंगाळे,आरती शिंपी यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.

 

जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील महिलांचे कार्य समाजापुढे येवून समाजातील इतरांनी प्रेरणा घ्यावी याकरिता कलासिद्धी फाउंडेशनतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील १७ महिलांना जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या संत गाडगेबाबा निवारा गृह येथे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले की, जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या प्रेरणादायी कामाची समाजातील इतरांना ओळख व्हावी या उद्देशाने महिलांना सन्मानित करण्यात आले आहे. बेघर निवारा केद्रांत अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम कलासक्ती फाउंडेशनने राबविला असल्याने त्यांचे कौतुक. कलासिद्धी फाउंडेशनच्या आरती शिंपी यांनी शहरातील कर्तृत्ववान महिलांना सन्मानित केल्याने इतर महिलांमध्ये देखील समाज सेवेची ओढ निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली.

Protected Content