औष्णिक केंद्रातील राखेवर चोरट्यांचा डल्ला; गुन्हा दाखल

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील किन्ही येथे दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून निघालेली 50 टन राख अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी ८ मे रोजी रात्री ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील किन्ही गावात असलेल्या दिपनगर येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. या औष्णिक विद्युत केंद्रातून मोठ्या प्रमाणावर राख काढण्यात आली. दरम्यान ही राख किन्ही परिसरात साठवलेले असताना संशयित आरोपी विजय शिवराम माळी रा. वडनेर जि. नाशिक याने 50 टन राख चोरून नेली. ही घटना गुरुवारी ८ मे रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. या संदर्भात शुक्रवारी ९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात उपकार्यकारी अभियंता माधव केंद्रे यांनी तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी विजय शिवराम माळी यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास बाविस्कर करीत आहे.

Protected Content