जळगाव प्रतिनिधी । हातचालाखीने मौल्यवान वस्तु लांबविणार्या सराईत गुन्हेगारास यावल नाका भुसावळ येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शुभम भीमराव वानखेडे (२४) रा. भुसावळ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सकाळी मॉर्निंग वॉक किंवा रात्री शतपावली करण्यासाठी जाणार्यांसोबत हातचालाखी करुन मौल्यवान वस्तू लांबविण्याच्या घटनां ६ ऑक्टोंबर रोजी घडली होती. यातील संशयित आरोपी भुसावळ शहरातील राहुलनगरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, विजय पाटील, अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, इद्रिस पठाण यांचे पथक तयार केले. या पथकाने शुभम वानखेडे याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.