Home Cities अमळनेर अमळनेरातून लायन्स टॉवरच्या केबिनमधून डिझेल व बॅटरीची चोरी : गुन्हा दाखल

अमळनेरातून लायन्स टॉवरच्या केबिनमधून डिझेल व बॅटरीची चोरी : गुन्हा दाखल

0
38


अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील जैतपिर व गलवाडे येथील रिलायन्स टॉवरच्या केबिन मधून डिझेल व बॅटरी चोरीस गेल्याची घटना आज उघडकीस आली आहे. यावेळी  १७ हजार ६०० रुपये किंमतीचा माल लंपास केला असून फिर्यादीवरून मारवड पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे

तंत्रिक भिकन पाटील व नानभाऊ पाटील हे गलवाडे येथे टॉवर पाहणीसाठी गेले असता तेथून ७ हजार ६०० रुपये किंमतीचे १०० लिटर डिझेल चोरीला गेलेले दिसून आले तसेच ५ हजार रुपये किमतीची १२ व्होल्टची बॅटरी चोरीस गेलेली आढळून आली. तसेच गलवाडे येथील टॉवरची देखील पाहणी केली असता तेथेही जनरेटरचे कुलूप तोडून ५ हजार रुपये किंमतीची बॅटरी चोरीस गेलेली आढळून आले.  अज्ञात चोरट्यानी दोन्ही ठिकाणी १७ हजार ६०० रुपयांचा माल चोरून नेला रिलायन्स जिओ चे सुपरवायझर महेश कासार यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहेत


Protected Content

Play sound