भुसावळ प्रतिनिधी । जळगाव ते भुसावळच्या दरम्यान डबल डेकर एयरबस धावणार असल्याचे आश्वासन आज केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिले. ते येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते.
महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी आज शहरातील संतोषी माता सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर ना. नितीन गडकरी, माजी मंत्री रक्षाताई खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार चैनसुख संचेती, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदू महाजन, नगराध्यक्ष रमण भोळे, रिपाइं नेते रमेश मकासरे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांनी केले.
ना. गडकरी यांनी आपल्या भाषणातून रक्षाताई खडसे यांनी आपल्या मनोगतातून पाच वर्षात केलेल्या कामांच्या बळावर मतदारांनी पुन्हा एकदा आपल्याला संधी द्यावी असे आवाहन केले. त्यांनी जोरदार टोलेबाजी करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. तर रक्षाताई खडसे यांच्या मेगा रिचार्ज प्रोजेक्टला गती मिळाली असून यामुळे या परिसरातील जनतेच्या जीवनात कायापालट होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. गडकरी यांनी आपण केलेल्या कामांची माहिती देतांना एक अभिनव संकल्पना मांडली. ते म्हणाले की, भुसावळ ते जळगावच्या दरम्यान डबल डेकर एयर बस सुरू होऊ शकते. यासाठी जळगाव महापालिका व भुसावळ नगरपालिकेने प्रस्ताव देण्याची गरज आहे. हा प्रस्ताव आल्यास ऑस्ट्रीयन कंपनीच्या सहकार्याने ही एयर बससेवा सुरू होऊ शकते. यात २६० प्रवाशांची क्षमता असेल अशी माहितीदेखील ना. नितीन गडकरी यांनी दिली.
पहा : ना. नितीन गडकरी नेमके काय बोलले ते !