यावल प्रतिनिधी । हतनुर धरणापासून यावलमार्गे चोपड्याकडे जात असलेल्या पाटाचे खोल पाण्यात पोहण्यास गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यु झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली होती. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास मुलांचे मृतदेह मिळून आले. यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला असून गावात शोककळा पसरली आहे.
त्यात शहरातील एका १६ वर्षीय व १३ वर्षीय अशा दोन बालकांचा समावेश आहे. दरम्यान, हतनुर धरणापासून तर यावल मार्गे चोपडयापर्यंत जात असलेल्या रुंदपाटचारीत गेल्या दोन दिवसापुर्वी धरणातून पुर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. येथील बोरावल रस्त्यावरील गयकाटया मारुती मंदिराजवळ पाटाचे पाण्यात पोहण्यास शहरातील सरस्वती मंदिर शाळेजवळील इयत्ता ६ वीचा गणेश निळकंठ दुसाने(सोनार) व दिपक जगदिश शिंपी १२ वर्षे हे दोन मित्रासह बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गेले असता ते खोल पाण्यात बेपता झाले.दोन मीत्र पाण्यात बुडाल्याचे पाहुन अन्य दोघे मित्रांनी भायभित होवून ते घरी परतले मात्र याबाबतची त्यांनी कुणाकडेही वाच्यता न केल्याने रात्री उशिरा पर्यंत दोन्ही कुटूंबियांनी बालकांचे शोध घेतले.अखेर ज्या बालकांच्या सोबत ही मुले गेली होती त्यांनी पाटावर
पोहण्यास गेल्याचे सांगीतल्याने रात्रभर कुटूंबियासमवेत शहरातील काही नागरीकांनी पाट परीसरात त्यांचा शोध घेतला गुरुवारी पुन्हा सकाळपासून शहरातील पट्टीचे पोहणारे आदिवासी युवक जीतु बारेला, जिगरू बारेला, किशन बारेला, विकी बारेला, कनिर बारेला भावला आणि देवानंद कोळी यांनी शोध घेतला असता सुमारे तीन तासानंतर ते पाण्यातील झाडा-झुडूपात अडकलेले दिसले तेव्हा त्यांना वर काढण्यात आले.
शहरात हळहळ दोन्ही बालके येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेचे विध्यार्थी असून या शाळेच्या परीसरातीलच रहीवाशी आहेत. दिपक हा एकुलता एक मुलगा असून आई परीत्यक्ता आहे. लहानपणापासूनच दिपक आजोळी आईजवळ राहतो. दोन्ही बालकांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.बालकांचे शवविच्छेदन येथील ग्रामीण रुग्नालयात डा. बी. बी. बारेला यांनी केले दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
अपहरणाचा गुन्हा
बुधवारी रात्री उशिरापर्यंत बालकांच्या कुटूंबियाना मुले पोहण्यास गेल्याचे माहीत नव्हते ज्या मीत्रासमवेत ते ते गेले होते त्यांची भितीने गाळण उडाल्याने त्यांनी कोणाजवळही वाच्यता न केल्याने मयत दिपक शिंपीचे मामा महेंद्र शांताराम बिरारी यांनी बुधवारी सकाळी अज्ञात आारोंपी शहरातून मुलांचे अपहरण केल्याचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर मयत मुलांच्या मीत्रांनी रात्री उशिरा पाटावर पोहण्याचे गेल्याचे सांगीतले त्यानुसार रात्रीपासून त्यांचा शोध सुरू केला.