मुक्ताईनगर व बोदवडकरांची बल्ले-बल्ले : विकासकामांसाठी मिळाला निधी !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगर आणि बोदवड या दोन शहरांच्या विकासकामांसाठी तब्बल ८ कोटी ६० लक्ष रूपयांचा निधी मिळाला आहे.

मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर व बोदवड नगरपंचायतींना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी सुमारे ८.६० कोटी रु. निधीसह विविध विकास कामे मंजूर झाली आहे. यामध्ये गुर्जर समाजाच्या मागणीनुसार वीर गुर्जर सरदार वल्लभभाई पटेल सांस्कृतिक सभागृह तसेच श्री स्वामी समर्थ केंद्र सांस्कृतिक सभागृह (७० लक्ष) तसेच इतर नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विकास कामे देखील मंजूर झालेले आहेत.सदरील कामे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दि.२५ मे२०२३ च्या प्रसिद्धी पत्रकान्वये मंजूर झालेले असल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली. यामुळे मुक्ताईनगर आणि बोदवड या दोन्ही शहरांमधील विकासकामांना गती मिळणार आहे.

मंजूर कामांची यादी खालीलप्रमाणे आहे !

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील स्मशान भूमी विस्तारीकरण करणे .

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील स्मशानभूमी येथे हायमस्ट लँप बसविणे.

बोदवड नगरपंचायत हद्दीतील जि.प मराठी मुलींची शाळा नं.१ येथे शौचालय बांधकाम करणे .

बोदवड नगरपंचायत हद्दीतील जि.प मराठी मुलींची शाळा नं.२ येथे शौचालय बांधकाम करणे .

बोदवड नगरपंचायत हद्दीतील जि.प उर्दू मुलींची शाळा येथे शौचालय बांधकाम करणे .

बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.१० मध्ये व्यायाम शाळा बांधकाम करणे.

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१३ मध्ये विविध रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे.

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१३ मध्ये विविध ठिकाणी गटार बांधकाम करणे.

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.६ मध्ये मोठ्या नाल्याचे बांधकाम करणे.

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१२ मधील खुला भूखंड विकसित करणे.

मुक्ताईनगर येथे गट क्र.३७८/२ मध्ये नगरपंचायत मालकीच्या जागेवर वीर गुजररत्न सरदार वल्लभभाई पटेल सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे. ता.मुक्ताईनगर

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे.

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१३ मध्ये विविध ठिकाणी गटार बांधकाम करणे.

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१२ मध्ये श्री.प्रवीण चौधरी यांचे घराजवळील तसेच विविध ठिकाणी गटार बांधकाम करणे.

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१३ मधील विविध खुले भूखंड विकसित करणे.

Protected Content