सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेची मुक्ताईनगरात जय्यत तयारी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अलिकडेच राज्यात झालेल्या सत्तानात्याची अभ्यायिका सुरू असतांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाची बाजू माजबुतीने मंडण्यासाठी शिवसेना संपूर्ण राज्यभर “महाप्रबोधन यात्रा” राबवत आहे. त्या अनुषंगाने शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेची मुक्ताईनगरात जय्यत तयारी सुरू आहे.

सदर मुख्यमंत्री शिंदे यांच्याच ठाण्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळवत आता टप्पा 2 म्हणून उत्तर महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यातील सर्व 5 बंडखोर आमदार यांच्या मतदारसंघात होत आहे. त्यापैकी मुक्ताईनगर येथे होत असलेल्या सभेची जय्यत तयारी सुरू असून आता मुक्ताईनगर शासकीय विश्रामगृह येथे नियोजन बैठक पार पडली. यात शिवसेना संपर्कप्रमुख विलास पारकरसह संपर्कप्रमुख डॉ.मनोहर पाटील, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हासंघटक गजानन मालपुरे, जेष्ठ शिवसैनिक ऍड. मनोहर खैरनार, युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा यांनी नियोजनाचा आढावा घेतला. बैठकीत उत्कृष्ट व भव्य नियोजन करण्याची गवाही युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे व प्रसिद्धी प्रमुख सुमेरसिंग राजपूत यांनी दिली.

बैठकीत माजी तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, सुमित हेरोळे कुंड शाखा प्रमुख, सचिन हेरोळे, सौरभ हेरोळे, कृष्णां रोधे, मोहन रोझटकर, अजय सपकाळे, प्रमोद सोडले, तुषार सलावत व असंख्य शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

 

 

 

 

Protected Content