फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या संशयिताला अटक

जळगाव प्रतिनिधी । रामानंदनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी रामानंदनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रामानंद नगर पोलीस ठाणे भाग -५, गुरनं १६३/२०१८ भादवि कलम ४२०, ४६५ प्रमाणे फसवणूकीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी गौतम मनोहर लहाने रा. पांडव नगरी, राधाकृष्ण अपार्टमेंट हा गुन्हा दाखल पासून फरार होता. संशयित आरोपी गौतम लहाने नाशिक येथे घरी आला असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार नाशिक येथील इंदीरा नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने संशयित आरोपी गौतम लहाने याला अटक केली. पुढील कारवाईसाठी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content