जळगाव प्रतिनिधी । शहरातील फ्रुटसच्या दुकानात गेल्या 13 वर्षांपासून काम करणारा कामगारांने गेल्या दीड वर्षांपासून वेळोवेळी संधी साधुन रोकड लांबविल्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या पाठीमागे सब्बीरभाई भावनगरवाला यांचे फ्रुटस् आणि जनरल प्रॉडक्टसचे होलसेल दुकान आहे. या दुकानावर 7 नोव्हेंबर 2017 रोजी 36 हजार 500 रूपयांची चोरी झाली होती. याप्रकरणी सब्बीरभाई भावनगरवाला यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र पाटील, शरद भालेराव आणि विजयसिंग पाटील यांनी गुप्त माहितीनुसार चौकशी करून संशयित म्हणून हरीष मुकुंदा पवार (वय-35) रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी याला ताब्यात घेतले.
संशयित आरोपी हा फ्रुट्स दुकानावर गेल्या 13 वर्षांपासून कामाला आहे. याने गेल्या दीड वर्षांपासून अनेक वेळा संधी साधुन दुकानात कोणीही नसतांना चोरी केल्याचे कबुल केले आहे. यापैकी त्याने 25 हजार रूपये काढून दिले आहे. याकामी स.फौ. अशोक महाजन , पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, शरद भालेराव, भरतसिंग पाटील, विनोद पाटील, अनिल देशमुख, रामकृष्ण पाटील, उमेश गोसावी यांनी काम पाहिले.