जळगावात छेडखानीच्या संशयावरून तरूणाला बेदम मारहाण

Crime 1

जळगाव प्रतिनिधी । मुलीची छेडखानी केल्याच्या संशयावरून एकाला पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहीती अशी की, शाम सोनवणे, आकाश मोरे यांच्यासह पाच ते सहा यांनी प्रमोद अनिल अहिरे (२२) मन्यारखेडा याला डीएसपी चौकात बोलावून माझ्या बहिणीशी जास्त का बोलतो, या कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवार २१ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

प्रमोद अहिरे हा शिक्षण घेतोय. गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास प्रमोद याला संशयीतांनी फोन करून डिएसपी चौकात बोलविले होते. त्याठिकाणी आलेल्या प्रमोद याला दुचाकीवर बसवून संशयीतानी संभाजी चौक पठाण बाबा दर्गाजवळ मोकळया जागेवर नेले. मुलीच्या छेडखानीच्या संशयावरून बोलून लाकडी दांडक्याने शाम सोनवणे याने प्रमोद याच्या हातावर लाकडी दांडूक्याने मारहाण करून दुखापत केली. जखमी प्रमोद याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान जखमीने दिलेल्या जबाबावरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उमेश साळुंखे हे करीत आहेत.

Protected Content