
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा मुक्ताईनगर तालुक्यातील भोई समाजाचे प्रमुख नेते छोटू भाऊ भोई यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले तसेच रुग्णसेवेचा उपक्रमही राबविण्यात आला. सेवाभावी वातावरणात साजऱ्या झालेल्या या वाढदिवसामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

जळगाव जिल्ह्यात भोई समाजाचे नेतृत्व करणारे छोटू भाऊ भोई हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने काम करत त्यांनी मुक्ताईनगरसह जिल्हाभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवसेनेत त्यांनी तालुका प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख आणि सध्या जिल्हा उपप्रमुख अशी विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबविले असून भोईराज मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.
छोटू भाऊ भोई यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक आणि लोकहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदाही त्याच परंपरेला पुढे नेत वाढदिवस सेवा आणि समाजकारणाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करत त्यांची विचारपूस करण्यात आली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णसेवेत सक्रिय सहभाग घेत रुग्णांना धीर देत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. या उपक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनीही समाधान व्यक्त केले.
यावर्षी छोटू भाऊ भोई चषक या नावाने क्रिकेट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून त्या स्पर्धेचे उद्घाटन अल्फला एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात उत्साहात पार पडले. क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांची सांगड घालत वाढदिवसाचे आयोजन करण्यात आल्याने कार्यकर्ते आणि समाजबांधवांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाला डॉ. योगेश राणे, शिवसेना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक संघटक अफसर खान, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, डॉ. प्रदीप पाटील, नगरसेवक गणेश टोंगे, भोई समाज शहराध्यक्ष प्रवीण भोई, उपाध्यक्ष मनोज भोई, चेतन भोई, रोहन भोई, दीपक भोई, भावेश भोई, शुभम भोई यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



