खासदार सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात बारामती लोकसभा मतसंघाच्या लोकप्रिय खासदार, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार गट) यांच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, जेष्ठ नेते मोहन पाटील सर, तालुका कार्याध्यक्ष अरविंद देवरे, राजेंद्र गायकवाड सर, भैय्याभाऊ पाटील (भोद), भगवान शिंदे, ऍड. कैलास मराठे, राहुल पाटील, दिनेश भदाणे, प्रफुल पवार, विक्रम पाटील यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील डॉ.अभिषेक बोरसे, विशाल केदार, महेंद्र सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.