जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरातील जनता बँकेजवळ दारू पिऊन झाल्यानंतर सोबत असलेल्या तीन मित्रांनी खिश्यातून ३ हजार रूपये काढून नेल्याची घटना रविवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुषार हरिभाऊ पाटील (वय-३३, रा. गेंदालाल मिल) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. टेलरकाम करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तुषार पाटील हा त्याचे मित्र मित्र विशाल वाल्मीक जाधव (२०, रा. लक्ष्मीनगर), रईस समशेर पठाण (२२, रा. गेंदालाल मिल), पिन्या उर्फ उदय शरद नन्नवरे (३५, रा. खडके चाळ) यांच्यासोबत दाणा बाजार परिसरात दारु पिण्यासाठी गेले होते. तेथे तुषार हे दारुच्या नशेत असताना त्यांच्या खिशातून वरील तिघांनी तीन हजार रुपये काढून नेले. या प्रकरणी पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ करीत आहेत.