धानोऱ्यात परमिटच्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा खंडीत

mahavitaran

धानोरा(प्रतिनिधी) :चोपडा तालुक्यातील धानोरा येथिल वीज महामंडळाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दिवसातुन १५ ते २० वेळा परमिटच्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने धानोरा परीसरातील ग्रामस्थानी वीज का गेली अशी विचारणा वीज मंडळाच्या कार्यालयात केली असता, तेथिल कर्मचारी अरेरावी करतात. तसेच येथिल कार्यालयातील लँडलाईन फोन बंद करुन लहान मोबाईल ठेवलेला असुन तो अनेकदा लागतच नाही. यासाठी येथिल वीज अभियंता कुणाल तडवी यांना फोन केले असता,तेदे खिल मोबाईल बंद करुन ठेवतात. याबाबत सुधारणा करण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. २५ जून रोजी धानोरा परीसरात तुरळक पाऊस पडला होता. यामुळे त्यांनी गावातील वीज तब्बल १४ तास बंद करुन ठेवलेली होती. फोन केले असता चोपडा वरुन बंद केली आहे असे सांगितले जाते. एकंदरीत येथिल वीज महामंडळाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत वरीष्ठांनी लक्ष घालावे,अशी मागणी केली गेलेली आहे.

ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बीले
येथिल वीजवितरण कंपनीकडून धानोरा तसेच परीसरातील गावातील वीजमिटर ग्राहकांना भरलेली बीले पुन्हा जास्तीचे देण्यात आलेले असल्याने ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. याबाबत सुद्धा ग्राहकांनी अभियंता कुणाल तडवी यांना फोन लावले असता,फोन बंद आढळुन आला. याबाबत लवकरच सुधारणा झाली नाही,तर आंदोलन छेडण्याचा इशारा येथिल ग्रामस्थांनी दिलेला आहे.

कारभार राम भरोसे
येथिल वीजवितरण कंपनीचा कारभार रामभरोसे सुरु आहे. काही महीन्यापूर्वी आ. चद्रकांत सोनवणे, धरणगाव येथिल कुलकर्णी येऊन गेलेत. पण समस्या जैसे थे आहेत.याबाबत स्थानिक पुढारी यांनी वेळीच लक्ष देण्याची सुद्धा मागणी केलेली आहे. दरम्यान, चोपडा येथील उपअभियंता मेघशाम सावकारे यांनी ग्राहकांना आलेली जास्तीचे बीले कमी करुन देऊत. धानोराबाबत अनेक तक्रारी आहेत यात सुधारणा करण्यात येतील. जे मोबाईल बंद ठेवतील त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

Protected Content