खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिनाच्या उत्सवात जगभरातील १०० हून अधिक देश सामील होतात. सन १९७३ मध्ये युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंटल प्रोग्रामने याची सुरुवात केली होती आणि ती आतापर्यंत सुरू आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश पर्यावरणाबाबत जनजागृती करणे हा आहे.
वैज्ञानिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास, आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट आपले पर्यावरण बनवते. गतिमान सजीवांच्या समीकरणाचे सजीव आणि नसलेले दोन्ही प्रकार आपले पर्यावरण बनवतात. सजीव किंवा जैविक घटकांमध्ये वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो, तर निर्जीव किंवा अजैविक घटकांमध्ये हवा, पाणी, माती इत्यादींचा समावेश होतो. प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. पर्यावरणाचे सर्व प्रमुख घटक जसे की हायड्रोस्फियर, वातावरण, बायोस्फियर, सर्व प्रदूषकांनी अडकले आहेत. प्रदूषकांची वाढती पातळी सामान्य पर्यावरणीय परिस्थिती नष्ट करत आहे.
या बाबी लक्षात ठेऊन याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब खामगांवद्वारे बुधवार दिनांक ५ जुन २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान टॉवर चौकात “वृक्ष वाटप” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पर्यावरणाच्या समतोलाचे महत्व पटवून देऊन त्यांना त्यांच्या परिसरात लागवड करण्यासाठी २० हून अधिक जातीच्या सुमारे ५५० विविध वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळेस खामगांव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांचेसह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी भेट दिली आणि या आगळ्यावेगळ्या प्रकल्पाची प्रशंसा केली. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्पप्रमुख प्रमोद अग्रवाल, सहप्रकल्पप्रमुख प्रफुल अग्रवाल व किशन मोहता, अध्यक्ष सुरेश पारीक, मानद सचिव आनंद शर्मा यांचेसह अनेक रोटरी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.