यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या वतीने ताण-तणाव मुक्ती व मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यात यावल शहर व तालुक्यातील तब्बल ३९३ रुग्णांनी या ठिकाणी येऊन आपली तपासणी केली. यातील काही गरजवंतांना जागेवर औषध उपचार व काहींना समुपदेशन करण्यात आले तर काही गरजु रुग्णांना पुढील विचारासाठी जळगाव येथे नेण्यात येणार आहे. सकाळ पासून या शिबिरासाठी रुग्णांनी गर्दी दिसुन येत होती.
यावल ग्रामीण रुग्णालयात १७ डिसेंबर रोजी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या वतीने ताण-तणाव मुक्ती, मानसिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. सकाळपासुन सुरू झालेल्या या शिबिरात मानसोपचार तज्ञ डॉक्टरांचे पथक,गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाची वैद्यकीय पथक रुग्णांच्या तपासणीसाठी उपस्थित होते. या शिबिरामध्ये शहर आणि तालुक्यातून १८५ महिला तर २०८ पुरुषांची उपस्थिती होती, यावेळी ३९३ रुग्णांची या शिबीरात तपासणी करण्यात आली. काही गरजूंना जागेवरच औषध उपचार देण्यात आला तर काही मानसिक पीडित रुग्णांना जळगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्याच प्रमाणे या शिबिरात तज्ञांनी समुपदेशन देखील केले तर गरजु रूग्णांची रक्त चाचणीसह इतर तपासण्या मोफत करण्यात आल्यात.
सदरील शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आकाश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या शिबिरामध्ये यावल ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कुरकुरे,बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत जावळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजू तडवी, तज्ञ डॉ. विजय पिठोळे, डॉ. तुषार सोनवणे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे राकेश अहिरे, विकास पाटील, कार्यक्रम अधिकारी तथा मानसोपचार तज्ञ डॉ. कांचन नारखेडे,गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. सुदर्शन राघव, डॉ. लावण्या वारीयर, डॉ. परितोष मंदोरकर, यावल रुग्णालयाच्या डॉ. वैशाली निकुंभ, डॉ.परवीन तडवी, इकबाल तडवी, राजनंदनी पाटील, छाया नन्नवरे, रविंद्र माळी,सुभाष कुळकर्णी यांची उपस्थिती होती या शिबिरा च्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानस तज्ञ दौलत निमसे यांनी केले तर अभार शिबिराचे व्यवस्थापक कांचन चौधरी यांनी मानले तर शिबीर यशस्वीतेकरीता मानसोपचार विभागाच्या ज्योती पाटील, विनोद गडकर, राखी भगत, मिलिंद बरोट, चंद्रकांत ठाकूर, अधिपरिचारीका ज्योत्स्ना निंबाळकर, देवेंद्र जवरे, कनिफनाथ कादे यांनी परिश्रम घेतले.