यावलच्या विस्तारीत भागात पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर चिखलराज (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । शहराच्या विस्तारित भागात रखडलेल्या कामे राहिल्याने पावसामुळे रस्त्याची दुरावस्था ही नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे झाले असून यामुळे स्थानिक रहिवाश्यांना वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशपाक शाह यांनी आज शुक्रवारी ९ जुलै रोजी सायंकाळी केला आहे..

अशपाक शाह पुढे म्हणाले की, यावल शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील विविध कामांसाठी पक्के रस्ते तोडण्यात आलेल्या रस्त्यांवर सर्वत्र चिखलराज झाल्याने नागरीकांना जाणे येणे जिकरीचे झाले आहे.  मागील एक वर्षापासुन शहरातील विस्तारित कार्यक्षेत्रातील नविन वसाहती मधील गंगानगर, पांडुरंग सराफ नगर, फालकनगर, चांद नगर, पवननगर, आयशा नगर आदी ठीकाणी विविध विकास कामांच्या नांवाखाली पक्के रस्ते तोडुन गटारी व नविन जलकुंभातुन होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी जलवाहीनीसाठी मोठ्या प्रमाणावर पाईपलाईन टाकण्यात आली. यासाठी डांबरीकरणाचे रस्त्यांमध्ये खोदण्यात आली. यामुळे पावसाळयात या रस्त्यावर ठीकठिकाणी खड्डे  निर्माण होवुन सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या खोदलेल्या डांबरीकरणाच्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी तसेच आदी प्रलंबीत विकास कामांसाठी त्वरित नगर परिषदव्दारे करण्यात यावी या मागणीसाठी आयशानगर मधील सामाजीक कार्यकर्ते अशपाक शाह यांनी आपल्या काही सहकार्यांसह यावल नगरपरिषदेसमोर ३ जुलै रोजी आमरण उपोषण केले होते. नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांच्या आश्वासनानंतर विस्तारित क्षेत्रातील वसाहतीमधील विकासकामे व समस्या तात्काळ सोडवु असे आश्वासन देण्यात आले होते. परंतू मात्र या उपोषणाच्या दरम्यान दिलेल्या आश्वासनाची नगराध्यक्ष नौशाद तडवी यांनी आपला शब्द पाळला नसल्याचे सांगुन संपुर्ण पावसाळयात नागरीकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे.  यासंदर्भात लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे अशपाक शाह यांनी सांगीतले आहे .

Protected Content