यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथे युवा सामाजीक कार्यकर्ते धनंजय चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने हृदयरोग व शस्त्रक्रियेचे भव्य असे शिबिर नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य व शत्रक्रीया शिबीराचा हिंगोणा व परिसरातील नागरीक व ग्रामस्थ बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या शिबीरात नागरीकांनी विविध उपचारा संदर्भातील आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घेतली यामध्ये हृदयाचे इ सी जी टुडे ईको तसेच औषध उपचार अशा अनेक सुविधा मोफत पुरविल्या गेल्या हे जनहिताचे सामाजीक उपक्रम आमदार शिरीष चौधरी मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा मुलगा धनंजय चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला होता. यामध्ये गोदावरी फाउंडेशनच्या वतीने डॉ. वैभव पाटील, डी .एम कार्डिओलॉजी तसेच डॉ. रतन जैन यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीरात सुमारे ३५० रूग्णांची तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. यात शस्त्रक्रियेसाठी १३, लहान मुल १२, १२ स्त्रीरोग, १६ डोळ्यांचे विकार, ०७ रूग्ण हाडाचे आजार असलेले आदींचा समावेश आहे. या शिबिरासाठी आमदार शिरीष चौधरी मित्र परिवाराच्या वतीने पंचायत समिती यावल गटनेता शेखर पाटील, हिंगोणा ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशोर फालक, सरपंच मारूळ ग्रामपंचायतचे सरपंच सैय्यद असद अहमद जावेद अली. या प्रसंगी गावातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती.
शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गफुर तडवी, वैद्यकीय अधिकारी फिरोज तडवी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक ठाकूर, महेश राणे, माजी सरपंच भूषण भोळे, भूषण राणे यांच्यासह अरमान तडवी, योगेश जंगले, पराग कुरकुरे, दिनकर जंगले, नशिबा तडवी यांनी महत्वाचे परिश्रम घेतले. परिसरात नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन भव्य असे शिबीर झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.