जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवजयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राजस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्या सप्ताह निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी व महा रक्तदान शिबिराचे आयोजन याप्रसंगी कांचन नगर सद्गुरु किराणा येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या शिबिरात अस्थिरोग कंबर मान पाठ सांधेदुखी बीपी शुगर रक्त तपासणी थायराइड गरोदर महिलांची तपासणी या विविध तपासण्या करण्यात आल्या असून जवळपास 150 रुग्णांनी लाभ घेतला व 15 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा शसकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकुर, नगरसेवक किशोर बाविस्कर, महिला आघाडी प्रमुख कल्पना पाटील, महानगर अध्यक्ष मीनल पाटील, युवक अध्यक्ष सुशील शिंदे, तूषार इंगळे, वैद्यकीय मदत पक्ष महानगराध्यक्ष विक्की राजपूत, डॉ. राजेंद्र सरोदे, डॉ.ज्ञानेश भोरडे, डॉ. प्राची, डॉ. प्रीती टोके, इंडियन रेड क्रॉसचे डॉ. अनिल चौधरी, तीलोतम जोशी, मंगेश ओतारी, गणेश काळे, हर्षाली गुले आदींची यावेळी उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्की राजपूत, ईश्वर राजपूत, कल्पेश राजपूत, पप्पु चौधरी, महेश जाधव, महेश कोळी, हर्षल राजपूत, शुभम राजपूत, राजेंद्र धनपाल राजपूत, अक्षय राजपूत, अशोक राजपूत, तरसोद मंदिर संस्थान सचीव आदींची यावेळी उपस्थिती होती.