शिंदाड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदाड येथे सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा व शिंदाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर नुकतच घेण्यात आले.

श्री रामनवमी, हनुमान जयंती सप्ताह तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती निमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मधुमेह, हृदयरोग, थायरॉईड, किडनी विकार यासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. ग्रिष्मा पाटील यांनी परिसरातील सुमारे २७५ रुग्णांची तपासणी केली.

सर्वप्रथम शिबिराचे उद्घाटन शिंदाड – पिंपळगाव (हरेश्र्वर) गटाचे माजी जि. प. सदस्य मधुकर काटे, डॉ. स्वप्निल पाटील डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील, माजी सरपंच कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध आजाराची काळजी कशा प्रकारे घ्यावी याचे मार्गदर्शन डॉक्टरांनी केले.

याप्रसंगी  ग्रामपंचायत सदस्य संदिप सराफ, विलास पाटील, स्वप्निल पाटील, समाधान पाटील, धनराज पाटील, बालू श्रावने, विजय देवरे, इंदूर परदेशी तसेच डॉ. जितेश पाटील, भरत पाटील, डॉ. एल. टी. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. दिपक चौधरी, डॉ. राजेंद्र परदेशी, सतिश बोरसे उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी संजय पाटील व सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content