जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथील कंपनी मालकाला बनावट टेस्टींग रिपोर्ट देवून सुमारे १० लाख ६१ हजार रूपयांची फसवणुक झाल्याचे उघडकीला आहे याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नशिक येथील कंपनीच्या मॅनेजरवर काल गुरूवारी दुपारी ४.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, किशोर डालू ढाके (वय-५३) रा. गिरणा टाकी रामानंद नगर यांचे एमआयडीसी परिसरातील सोयो सीस्टीम व सोयो एनर्जीज प्रा. लिमीटेड नावाची कंपनी आहे. नाशिक तालुक्यातील रांजनगाव येथील हायफिजीक्स कंपनीचे व्यवस्थापक समीर कुळकर्णी यांनी किशोर ढाके यांचा विश्वास संपादन करून टेस्टींग रिपोर्ट देण्याचे सांगून २१ जानेवारी २०२० ते १० जुलै २०२१ दरम्यान १० लाख ६१ हजार ७०० रूपये आरटीजीएस द्वारे ऑनलाईन पैसे पाठवले. त्यानंतर हायफिजीक्स कंपनीने त्यांना बनावट सर्टीफिकेट खरे असल्याचे सांगून फसवणूक केली आहे. याप्रकरणी किशोर ढाके यांच्या फिर्यादीवरून हायफीजीक्स कंपनीचे व्यवस्थापक समीर कुळकर्णी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात काल गुरूवारी दुपारी ४.३० वाजता फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.