जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणाऱ्या बढे कॅपिटल्सतर्फे गुरुवारी (दि.६) फ्रँकलिन टेम्पलटनचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर यांचा टॉकशो छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

याप्रसंगी गुंतवणूकदारांना प्रशिक्षीत करून, त्यांच्या गुंतवणूकीचा अधिक फायदा मिळण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या बढे कॅपिटल्सच्या मोबाईल ॲपचे लॉचिंग करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यासाठी फ्रँकलिन टेम्पलटनचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर यांचा टॉक शो ही आयोजित करण्यात आला आहे.
अविनाश सातवळेकर हे फ्रँकलिन टेम्पलटन एसेट मॅनेजमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. भारतातील मुंबई विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी वाणिज्य विषयात पदवी प्राप्त केली. याव्यतिरिक्त, त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले आहे. त्यांच्याकडे सी. एफ. ए. चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट चार्टर आहे आणि इतर अनेकांबरोबरच ते सी. एफ. ए. सोसायटी ऑफ सॅन फ्रान्सिस्को (सी. एफ. ए. एस. एफ.) आणि सी. एफ. ए. संस्थेचे मानद सदस्य आहेत.
दरम्यान या कार्यक्रमाचा जळगावकरांनी लाभ घेण्याचे आवाहन बढे कॅपिटल्स यांच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर बढे यांनी केले आहे.