धनाजी नाना महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळा

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत “एन्हान्समेंट इन एम्प्लॉयबिलिटी थ्रू स्किल डेव्हलपमेंट” या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 4 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभाला अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. एस एस पाटील उपस्थित होते. रोजगाराभिमुख शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कौशल्यांवर आधारित करिअर निवडण्याचे आवाहन उद्घाटक डॉ सचिन नांद्रे यांनी केले. सदर कार्यशाळेत पहिल्या सत्रात प्रा. सुरेश पांडे यांनी ‘एनालिटिकल स्किल्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ जगदीश खरात सर होते. प्रा. डॉ.सचिन नांद्रे यांनी दुसऱ्या सत्रात ‘इंटर पर्सनल स्किल्स अँड लीडरशिप’ या विषयावर विवेचन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ कल्पना पाटील होत्या.

कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात प्राचार्या डॉ लता मोरे, शिक्षणशास्त्र महाविद्यालय खिरोदा यांनी ‘इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल्स’ या विषयाची मांडणी केली. तिसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा डॉ मारोती जाधव यांनी भूषविले. कार्यशाळेच्या अंतिम सत्रात प्रा डॉ जुगल घुगे, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव यांनी ‘टाईम मॅनेजमेंट’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चौथ्या सत्राचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ.हरीश नेमाडे होते. सदर कार्यशाळेत परिसरातील विविध महाविद्यालयातील 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

कार्यशाळेच्या आयोजनासाठी समन्वयक म्हणून डॉ. सागर धनगर यांनी जबाबदारी पार पडली. सदर कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार माननीय श्री. शिरीषदादा मधुकरराव चौधरी व सर्व कार्यकारी संचालक मंडळ व प्राचार्य प्रा. डॉ राजेंद्र वाघुळदे यांचे मार्गदर्शन लाभले प्रा. निखिल कुमार वायकोळे, प्रा.राहुल नारखेडे, प्रा. डॉ. सतीश पाटील, प्रा डॉ.पंकज सोनवणे प्रा. वसुंधरा फेगडे तसेच त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ राजेंद्र राजपूत व प्रा निकिता चौधरी यांनी केले.

Protected Content