मोटाराची ट्रॅक्टरच्या धडकेत चार जण ठार; एक गंभीर जखमी

लातूर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भरधाव मोटारीने ट्रॅक्टरला धडक दिल्याने चार तरुणांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना लातूर-नांदेड महामार्गावरील आष्टामोड-महाळंग्रापाटीदरम्यान पहाटे तीनच्या सुमारास घडली. हे सर्व नांदेड येथील असून, तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते.शिवराज हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६), सोहन बालाजी कोतवाल (२७), लक्ष्मण राजाराम कात्रे (३३), कृष्णा मिठ्ठुलाल मंडले (२८, सर्व नांदेड) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. शुभम किशोर लंकाढाई गंभीर जखमी आहे.

Protected Content