अमरावती (वृत्तसंस्था) आंध्र प्रदेश येथे गोदावरी नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. बोट बुडाल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, २३ जणांना वाचवण्यात यश आले असले. तरी मृतांचा आकडा देखील वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळातर्फे या बोटीचे परिचालन सुरू होते. दुसरीकडे मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. अशातच ६० जणांना घेऊन ही बोट निघाली. कच्चुलुरू येथे ही बोट बुडाली. घटनेची माहिती मिळताच ३० जवानांची एनडीआरएफची दोन पथकं घटनास्थळी दाखल झाली असून बुडालेल्या पर्यटकांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मृतांच्या कुटूंबीयांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे.