Home राज्य खाजगी बस दरीत कोसळून चार ठार, ४५ जखमी

खाजगी बस दरीत कोसळून चार ठार, ४५ जखमी

0
146

 

images 1 1

 

 

ठाणे (प्रतिनिधी) मोखाडा-त्र्यंबकेश्वर रोडवर एका खासगी बसला आज दुपारी भीषण अपघात झाला आहे. तोरंगणा घाटात ही बस दरीत कोसळल्याने चार प्रवासी ठार तर ४५ जण जखमी झाले आहेत. शिर्डी दर्शन करून डहाणूकडे जाताना बसला हा अपघात झाला. ब्रेक फेल होऊन बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

आज दुपारी २:४५ च्या सुमारास मोखाडा-त्र्यंबकेश्वर रोडवर तोरंगणा घाटात पालघरला येत असताना ही खाजगी बस २५ फुट दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ४५ जखमींना त्र्यंबकेश्वर येथील सरकारी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बस दरीतून वर काढण्याचे काम सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound