रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव आयशरने बैल घेऊन जाणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरूणासह त्याचे चार बैल ठार झाल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील पाल रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी आयशरचालकावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख फिरोज शेख गंभीर रा. बहादरपूर जिल्हा बऱ्हाणपुर ह. मु. पाल असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेख फिरोज शेख गंभीर रा. बहादरपूर जिल्हा बऱ्हाणपुर ह. मु. पाल हा शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजेचे सुमारास पालहून रावेर येथील शुक्रवारच्या बाजारात बैलं विक्रीसाठी घेऊन पायी येत होता. त्यावेळी हबीब तडवी यांचे पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने येणारी आयशर क्र (एम एच १९ झेड ५२८५) ने जोरदार धडक दिल्यामुळे पादचारी शेख फिरोज शेख गंभीर (वय ३२) याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले चार बैल देखील ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शेख नजीम शेख रफीक यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वाहन चालक पिंटू पूर्ण नाव माहित नाही हा फरारी झाला आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत .